शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी. राज्यमंत्री संजय बनसोडे 

शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी.
राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर: शहरात  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन  प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे  कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये , या कठीण प्रसंगी सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
उदगीर शहरात आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने,वैद्यकीय उपसंचालक डॉ एकनाथ माले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ  संजय ढगे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, उप अधीक्षक श्री जवळकर,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की  उदगीर शहरात कोरोना संक्रमित रूग्ण आढळले आहेत त्या भागातील पन्नास वर्षी वरील मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या सर्व नागरीकाचे स्वँब तपासणी करण्यात येणार आहेत. या भागातील संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. शहरातील हा  परिसर मागील तीन दिवसा पासून सील करण्यात आला आहे या परिस्थितीत नागरिकांना लागणार्या जीवन आवश्यक वस्तू घरपोच देण्यात येणार आहेत  यासाठी नगरपालिकेनी हेल्पलाईन व विशिष्ट नंबर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अन्य रुग्णांना  दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत
 विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या ठिकाणी कँन्सलर ची  नेमनुक करण्यात येईल. यावेळी नागरिकांना सर्व जीवन आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्याच्या सुचना 
यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही