दामिनी महिला बचत गटाच्या वतीने मास्कचे वाटप

दामिनी महिला बचत गटाच्या वतीने मास्कचे वाटप


उदगीर :  जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त येथील
दामिनी महीला बचत गटाच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, नगरसेवक मनोज पुदाले उपस्थित होते.
उदगीर नगर परिषद अंतर्गत दामिनी महिला बचत गटांच्या माध्यमातून  आतापर्यंत अंदाजे २५ हजार मास्क तयार करून विविध सामाजिक संस्थांना व गावांना पुरविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गटाच्या माध्यमातून मास्क तयार करण्यासाठी दररोज १५ ते २० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे. विविध संस्थांना मास्क पुरविण्या सोबतच सामाजिक जाणीवेतून गरजूंना मास्कचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
या मास्क निर्मितीसाठी  गटाच्या अध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, सचिव शेख शन्नो, सरोज वारकरे, मुलाबी शेख, रुक्मिणी मस्के, शोभा बोधनकर, पुदाले मावशी,
बालिका मस्के, सुमय्या शेख, कोमल लखनगावे सह इतर सदस्या परिश्रम घेत आहेत.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज