मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणेंकडून पन्नास हजाराची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणेंकडून पन्नास हजाराची मदत


* पत्नीच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सतीश शिवणे यांचे कौतुकास्पद पाऊल *


लातूर, दि. 13:-  नगर परीषद विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी सोमवारी आपल्या पत्नीच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार रूपयांचा निधी दिला आहे. सोमवारी (दि. 13) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. अशा परीस्थितीत कोणीही सुजाण नागरीक वाढदिवस साजरा करण्याचा विचारही मनात आणू शकत नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांच्या पत्नी शर्मीला यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला ५० हजारांची मदत देण्याची संकल्पना मांडली. सतीश शिवणे यांनीही त्याला दुजोरा देत सोमवारी ती लगेचच अंमलात आणली आणि फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून पन्नास हजारांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शर्मिला शिवणे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुख्यमंत्री सहायता निधीत भर टाकल्याबद्दल आभारही  मानले.
                                                        *****


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही