धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*

*धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*


उदगीर:-कोरोना विषाणू संसर्गा मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व मानवता धर्माचे पालन करीत राष्ट्रीय उत्तरदायित्व पार पाडताना तन-मन-धनाने प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर, जि.लातूर यांच्या वतीने प्रधानमंत्री केअर फंडामध्ये दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
उदगीर विधानसभेचे पंधरा वर्ष व अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वर्षे महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणारे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून सबंध महाराष्ट्रात अनेक विधायक व समाजोपयोगी कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करणारे व लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी भगवानसिंह बायस गुरुजी, सकारात्मक तथा दुरदृष्टीकोनातुन नियोजनबद्ध काम करणारे संस्थेचे सहसचिव अविनाश जाधव आणि संचालक मंडळातील अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने सदरील निधी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करून खात्यात जमा झालेल्या चेकची व पावतीची सत्यप्रत उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रुग्णालय अधीक्षक डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी सुपूर्द केली.
कोरोना विषाणू संसर्ग झालेले पॉझिटिव्ह रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींसाठी म्हणजेच माइल्ड, मॉडरेट व सिव्हीअर अशा तिन्ही प्रकारच्या केसेस मध्ये काॅरेनटाईन व आयसोलेशन साठी अनिवार्य असलेली अत्यावश्यक औषधी-उपकरणे व तसेच प्रसंगी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालून अत्यंत निस्वार्थ व निरपेक्ष भावनेतून कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची चिकित्सा करणारे तज्ञ डॉक्टर्स,महसूल,पोलीस,ईत्यादी शासकीय-निमशासकीय-खाजगी-स्वयंसेवी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी,पॅरामेडिकल व नॉन टेक्निकल कर्मचारी यांना संसर्गापासुन संरक्षण मिळावे व त्यांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी कोवीड -19 मास्क, पीपीई किट,ग्लोव्हज, सॅनिटायझर,ईत्यादी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करण्याकरीता रक्कम उपयोगी पडेल जेणेकरून मानवसेवा हिच ईश्वरसेवा हा उदात्त हेतू साध्य होईल व कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल या सद्भावनेपोटी सदरील रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली आहे. सद्यस्थितीत सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज मध्ये करण्यात आले असून रुग्ण तपासणी व औषधोपचार सुरळीत पणे सुरू आहे.भविष्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या भयावह समस्येला तोंड देण्यासाठी प्रशासनाला महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असेल अशी माहिती डाॅ.दत्तात्रय वि.पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. 
या प्रसंगी महसुल विभागाचे अन्य अधिकारी तथा कर्मचारी व तसेच धन्वंतरी अायुर्वेदिक मेडीकल कॉलेज अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,उदगीर, जि.लातूरचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज