राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच साजरी केली आंबेडकर जयंती

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरीच साजरी केली आंबेडकर जयंती
लातूर :  राज्याचे पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी राज्यमंत्री  श्री. संजय बनसोडे यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरीच कुटुंबियांसोबत साजरी केली.
       यावेळी श्री व सौ बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी सर्व नागरिकांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी व कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या मोहिमेत शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केलॆ.