कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्हातुन येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी -राज्यमंत्री संजय बनसोडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्हातुन येणाऱ्या 
लोकांवर कडक कारवाई करावी
                 -राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉक डाऊन चा दुसरा टप्पा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात ही कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीमा अधिक कडक कराव्यात. कोणत्याही नागरिकांना  अत्यावश्यक कारणाशिवाय यात सुट देऊ नये. या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर अत्यंत कठोर कारवाई प्रशासनानेही करावे असे निर्देश राज्याचे  पर्यावरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री  संजय बनसोडे यांनी दिले.
       लातूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने उपस्थित होते.
      राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सूचित केले की,  परजिल्हातुन किंवा परराज्यातुन आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवावे, शहरी भागातील नगरसेवकांनी आपल्या भागात मुंबई व पुणे येथून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला दयावी बाहेरून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षातच ठेवावे.
        लातूर जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेला अँटी कोरोना फोर्स हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक गावात अनेक युवक खुप चांगले काम करीत आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच गावात प्रवेश दिला जात आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री  बनसोडे यांनी केले आहे. 
     लॉक डाउन  काळात परजिल्हातुन अवैध रित्या आलेल्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. तर जिल्ह्याच्या सर्व सीमा वर कडक नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी दिली.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही