पोलिस कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप. समर्थ विद्यालयाचा उपक्रम

  • पोलिस कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप. 

  • समर्थ विद्यालयाचा उपक्रम :



  1. उदगीर : कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून चोवीस तास सेवा देणा-या पोलिस कर्मचारी यांना एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी बुधवारी दुपारी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली.  
    उदगीर शहरात उमा चौक येथे कर्तव्यावर असलेल्या व वाढवणा पाटी, पोलिस स्टेशन येथे जाऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.  सोबतच कोरोना या विषाणू जन्य आजाराबद्दल जाणीव जागृती करणारे पत्रक ही वाटप करण्यात आले. यावेळी वाढवणा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रा. एम. व्ही. स्वामी, रसूल पठाण, संजय जाधव यांची उपस्थिती होती. सामाजिक अंतर राखत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणा-या या पोलिस कर्मींना वंदन करत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज