लॉकडाऊन काळात गरजूंना विहिपची मदत
उदगीर
केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरेना या माहामारीचे संकट कोसळले असून याच्या बचावासाठी सरकारने लॉक डाऊन घोषित केला आहे. या लाॅक डाऊनमुळे अनेकांवर पासमारीची वेळ आली आहे. अशा संकटसमयी विश्व हिंदू परिषद समोर येऊन गोरगरीब व गरजूंना मदतीचा हात पुढे करत आहे. 26 मार्च पासून सतत गरजूंना आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा करत असून आज दि. ७ एप्रिल रोजी लोणी मोड येथील भटक्या कुटूंबाना दहा दिवस पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लाॅकडाऊन करण्यात आले असुन अनेक गोरगरिब व शिक्षणासाठी बाहेरगावी राहणार्या व्यक्तींवर उपासमारीची वेळ येवु लागली. अशावेळी लातुर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आपआपल्या परिने मदत केली जात आहे. २६ मार्च ते ७ एप्रिल पर्यत अनेक कुटुंब व विद्यार्थ्यांना भोजनाची व अन्नधान्याची मदत करण्यात आली आहे. आज दि. ७ एप्रिल रोजी लोणी मोड येथील २६ कुटूंबाला १०दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट देण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, अजय दंडवते, विहिंपचे संघटक मंत्री संतोष कुलकर्णी, जिल्हामंत्री विलास खिंडे, रघुनाथ महाराज, सीमा लोया, किरण सनगले, रूक्मण पेन्सलवार, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.
विहिंपच्या वतीने मदतीचा ओघ सुरु असून दि. २६ मार्च रोजीलोणी मोड येथे पाली राहणाऱ्या २६ परिवारास १० पुरेल इतके धान्य वाटप, शिक्षणासाठी उदगिरीत राहात असलेल्या आंध्र-तेलगना येथील ३५० विद्यार्थ्यांना दि. २८ ते ३१ मार्चपर्यंत मुलांना सकाळी एक वेळचे जेवन देण्यात आले व दि. १ एप्रिल रोजी , जेवन बनवुन वाढण्याची गैरसोय होत असल्यामुळे ३५० मुलांना ५ दिवस पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. या संकट समयी विश्व हिंदू परिषदेच्या सोबत राहुन मदत करणार्या शेकडो दानशुर व विहिंपच्या कार्यकर्त्यांचे विहिंपच्या माध्यमातुन स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हे सेवाकार्य समाजास अर्पण असल्याने विहिंप या कामास आपले कर्तव्य समजते असे संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा