विवाहाचा खर्च टाळून आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांकरिता मदतीचा हात १३१ अन्यधान्य किट प्रशासनाकडे सुपूर्त उदगीर :

विवाहाचा खर्च टाळून आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांकरिता मदतीचा हात


१३१ अन्यधान्य किट प्रशासनाकडे सुपूर्त
उदगीर : येथील विपीन जाधव यांचा वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे यांच्याशी छोटेखानी व घरी विवाह सोहळा पार पडला. कोरोना विषाणुजन्य आजारामुळे आलेल्या आपती मध्ये आपले कर्तव्य आहोरत्र आरोग्यक्षेत्रातील व सफाई कर्मचारी ,सर्व अधिकारी व कर्मचारी  आपले कर्तव्य बजावत आहेत. साफसफाई कर्मचारी विशेषतः आरोग्य सेविका व अशा ताई घरोघरी जाऊन स्वतःची व आपल्या परिवराची पर्वा न करता ते आपल्या जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या सेवेच्या ऋण्यात राहुन, ह्या निमित्त आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार यांना १३१ अन्यधान्य किट देण्यात आले. विवाहाचा खर्च टाळून सामाजिक जाणिव ब जबाबदारी ओळखून या दाम्पत्यने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्याकडे या अन्नधान्य किट सुपूर्त केल्या. यावेळी नगर परिषद प्रशासनाचे हालकुडे, डॉ.संतोष पाटील, डॉ. रमण ऐनाडले, डॉ. स्नेहा बोबडे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती विपीन जाधव यांनी दिली


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज