कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप सभापती सिद्धेश्वर पाटील यांचा पुढाकार : राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप
सभापती सिद्धेश्वर पाटील यांचा पुढाकार :
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप
• उदगीर : कोरोना प्रादुर्भावामुळे देशात लागू केलेल्या लोकडाऊन मुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे, ही बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
• यावेळी बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, सिद्धेश्वर पाटील, रामराव बिरादार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उपविभागीय प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, बाजार समितीचे संचालक शिरीषकुमार पाटील, संजय पवार, धनाजी जाधव, संतोष बिरादार, गौतम पिंपरे, पद्माकर उगीले, सुभाष धनुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख आदी उपस्थित होते.
• उदगीर हे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणा या तीन राज्याच्या सीमेवर वसलेले शहर असून मोठी बाजारपेठ आहे. मराठवाड्यात अग्रगण्य बाजार समितीमध्ये उदगीरच्या बाजार समितीचा उल्लेख केला जातो. या बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात आडत व्यापारी असून त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमालाची संख्याही मोठी आहे. 
• कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसापूर्वी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका उदगीरच्या बाजार समितीतील हमालानाही बसला आहे. गेल्या दहा दिवसापासून बाजार बंद असल्यामुळे हमाल बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवांसाठी अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेतला. गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, चहापत्ती, साबण, तेल आदी जीवनावश्यक साहित्य आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.