*श्री भगवान परशुराम जन्मोत्सव घरातच साजरी करावी:-*

*श्री भगवान परशुराम जन्मोत्सव घरातच साजरी करावी:-*


श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे उदगीरमधील सर्व ब्रह्मवृंदाना आव्हान करण्यात येतो की,दि.२५ एप्रिल २०२० शनिवारी रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जयंती घरीच साजरी करावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
उदगीर शहरात मोठ्या थाटामाटात व आंनदात प्रतिवर्षी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने कोणतेही सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होणार नसून शनीवारी परशुरामभक्तांनी ही जन्मोत्सव घरातच पुजा, प्रार्थना, पाळणा व वचन साहित्यांचे वाचन करून साजरी करावी असे आवाहन श्री भगवान परशुराम सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते विजय कुलकर्णी,विवेक कुलकर्णी  ऋषिकेश द्वयपायन,नरेंद्र घनपाठी,विलास बुधोडकर,वासुदेव द्वयपायन,बबन कुलकर्णी,योगेश कुलकर्णी,यांनी केले आहे.


Popular posts
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. उर्मिला चाकूरकर ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम: महिलांचा सन्मान
Image
उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयास राज्य शासनाची मंजुरी* *उदगीरकरांची महाराष्ट्रात एम.एच. - ५५ ही नवी ओळख* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
Image