दातृत्वाचे दुसरे नाव राजेश्वर निटूरे
कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्याना निटूरे परिवाराची सढळ हाताने मदत:
उदगीर: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे अन्नधान्यावाचून उपासमार होणाऱ्या कुटुंबाला माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी सढळ हाताने मदत केली असून आजपर्यंत आठ हजार कुटुंबाना ही मदत पोहोचली आहे. दातृत्वाचे दुसरे नाव म्हणजे राजेश्वर निटूरे असे म्हटल्यास यानिमित्ताने वावगे ठरणार नाही.
देशातील जनतेला कोरोनाच्या आजाराने हादरवून टाकले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचीच चर्चा आहे. वरचेवर बळावत चाललेला हा आजार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडल्यास अन्य सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याचा परिणाम समाजात शेवटच्या घटकावर अधिक झाला आहे. रोजच्या रोज रोजगार करून पोट भरणाऱ्या लोकांची उपासमार होऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन नेहमीच सढळ हाताने समाजाला मदत करण्यासाठी पुढे असणाऱ्या माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी या संकटात सापडलेल्या जनतेला अन्नधान्याची मदत करण्याचा निर्णय घेतला व तात्काळ शहरातील अशा गरजू लोकांना मदत देण्याचे काम सुरू केले.
ही मदत करीत असताना एक किलो तूरदाळ, तीन किलो तांदूळ, तीन किलो गव्हाचे पिट, एक किलो साखर,साबण, टरबूज, चहापत्ती पुडा१ व बिस्किट,
अर्धा किलो तेल अशा वस्तूचे किट तयार करून गरजू लोकांना या अन्न धान्याचे किट पोहोच करण्यात आले. विशेष म्हणजे मांडुरंगी, आष्टा व तिवटग्याळ येथील शेतकऱ्यांकडून बांधावर जाऊन टरबूज खरेदी करून ते उदगीरच्या गरजू लोकांना वाटण्यात येत आहेत.
*आजपर्यंत जवळपास आठ हजार लोकांना मदत*
गेल्या 26 मार्च पासून लोकांना मदत करण्याचे काम चालू असून कोरोनाच्या काळात जवळपास सहा हजार कुटुंबापर्यंत ही मदत गेली आहे तर आज राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार लोकांना ही अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे.
*विजय निटूरेंच्या पुढाकारातून दररोज दोनशे लोकांना मोफत जेवण*
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा दातृत्वाचा वारसा त्यांचे पुत्र जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे यांनी पुढे चालविला असून आ. धीरज देशमुख यांच्या वाढदिवसापासून दररोज दोनशे लोकांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम राबवित आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. येथेही आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते गोरगरिबांना मोफत जेवण देण्यात आले.
निटूरे परिवाराकडून आजच्या या कठीण काळात गोरगरीब जनतेला होत असलेल्या या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
मदत चालूच राहील...
दरम्यान कोरोना आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी स्वतः स्वतःचे रक्षक बनून घरीच राहण्याचे आवाहन करीत माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी या अडचणीच्या काळात कोणाची उपासमार होणार नाही याची आपण काळजी घेऊ, आतापर्यंत ही मदत केली ती स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत चालूच राहील नागरिकांनी काळजी करू नये असे आवाहन राजेश्वर निटूरे यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा