उदगीर तालुक्यातील कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई होईल - तहसीलदार व्यंकटेश मुंडे


उदगीर तालुक्यातील कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई होईल - तहसीलदार व्यंकटेश मुंडे


 


उदगीर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यातील खाजगी उद्योगधंदे व कारखाने वगैरे मधील कामगार इतर ठिकाणी स्थलांतरित होत असतील तर आशा कारखान्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. असा इशारा उदगीर तहसील कार्यालयाचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिला आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी  प्रशासन प्रयत्नशील असून उदगीर शहरातील व तालुक्यातील काही कारखान्यातील व उद्योग धंद्यातील कामगार हे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित कामगारांना संभाळण्याची जबाबदारी त्या-त्या कारखाने व उद्योग धंदा मालकीच्या व्यवस्थापनाची किंवा संचालकाची आहे. या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टन्सची  अंमलबजावणी करण्यात यावी. गरज पडल्यास या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारी राहील.  याप्रकरणी थोडाफार ही हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्यास त्यावरती  कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा  दिला आहे. संबंधित कारखाने,उद्योग, व्यावसाईक, मालक यांनी परराज्यातील व इतर कामगाराची व्यवस्था करावी. त्यांना काही अडचणी  आल्यास प्रशासनास कळवावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.  कारखानदार मालकास  त्या कामगाराची भोजन व इतर सुविधा देण्यात असमर्थ असतील तर त्यांना प्रशासनाच्यावतीने किंवा एनजीओच्या साह्याने सर्व सुविधा पुरविण्यात येतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली