ग्रामीण भागात निर्जंतुकीकरणाची फवारणी रायुकाँचे सूरज चव्हाण यांचा पुढाकार

ग्रामीण भागात निर्जंतुकीकरणाची फवारणी
रायुकाँचे सूरज चव्हाण यांचा पुढाकार
निलंगा : गेल्या दोन महिन्यापासून कोरोना आजाराने थैमान घातले असून ग्रामीण भागातील नागरिकांचा यापासून बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकारातून गावोगावी निर्जंतुकिकरणाची फवारणी करण्यात येत आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुपुत्र असलेले सूरज चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करीत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. 
सध्या सर्वत्र कोरोना आजाराने हाहाकार माजविला असून नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत गावोगावी भेटी देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम सूरज चव्हाण करीत असून नागरिकांना या कोरोनाशी एकजुटीने लढण्याचे आवाहन करीत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहेत.गोरगरिबांना अनेक प्रकारचे साहित्य वाटप करत आहेत. अनेक ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील समस्या जाणून घेत आहेत. निलंगा येथे नुकतेच शरद पवार विचार मंच च्या वतीने धान्य तथा गरजु वस्तुचे किट वाटप सुरज चव्हाण च्या हस्ते करण्यात आले.
आत्ता सध्या त्यांच्या हाती निर्जंतुकीकरण फवारणी चे काम ते स्वतः गावात जाऊन करीत आहेत. प्रत्येक गावात जाऊन निरजंतुकीकरणाची फवारणी करीत असताना सूरज चव्हाण नागरिकांशी संवाद साधत असून त्यांच्या मदतीमुळे नागरिकामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज