निलंगा तालुक्यातील 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह : उदगीरच्या तिघांची तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह

निलंगा तालुक्यातील 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह : उदगीरच्या तिघांची तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह


लातूर, :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 18.05.2020 रोजी एकुण 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 9 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 3 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, निलंगा येथुन 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन 2, अहमदपुर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण 23 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असुन 17व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बीड जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी16व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण आज 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 106 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


*निलंगा येथील सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून प्रवास करून आलेले आहेत ते कोराळी तालुका निलंगा येथील मूळ रहिवासी असून सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत तेथून ते प्रवास करून निलंगा येथे दाखल झालेले असून त्यांना निलंगा येथील संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज