श्यामार्य कन्या विद्यालयात ई लर्निंग चा उत्साहपूर्ण प्रतिसाद

श्यामार्य कन्या विद्यालयात ई लर्निंग चा उत्साहपूर्ण प्रतिसाद


     उदगीर: सद्यस्थितीत पुर्ण भारत देश पर लॉक डाऊन असल्यामुळे शासनाच्या परिपत्रका प्रमाणे व मा. शिक्षणाधिकारी उकिरडे साहेब यांच्या आव्हानास  अनुसरून श्यामार्य कन्या विद्यालय उदगीर द्वारा "लर्निंग फ्रॉम होम " चे क्लासेस सुरुवात करण्यात आलेले आहेत .यामध्ये सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिसाद दिलेला आहे .एप्रिल महिन्यातच इयत्ता दहावी या वर्गाचे ज्यादा वर्ग सुरुवात होतात ,पण लॉक डाऊन या परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर वर्ग दहावीचे जादा वर्ग घेऊ शकलेले नाहीत. तरीसुद्धा शासनाने सांगितलेल्या परीपत्रकाप्रमाणे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामार्य कन्या विद्यालयात 'ई लर्निंग फ्रॉम होम'एप्रिल महिन्यापासून चालू करण्यात आलेले आहेत. यास भरभरून असा प्रतिसाद सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी दिलेला आहे
      श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री बैले  व्ही डी  यांनी वर्ग पाचवी ते दहावी सर्व वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून ई लर्निंग चे  वर्ग घेण्यात येत आहेत .लहान वयोगटातून सुद्धा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे .
        प्रोजेक्ट मध्ये सर्व शासकीय नियमाचे पालन करून व शासनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले आहे कारण आपल्याजवळ असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे हे आवश्यक आहे.  बदल हा निसर्गाचा नियम आहे या उक्तीप्रमाणे आपण सर्व शिक्षकांनी हा बदल स्वीकारावा व परिस्थितीनुसार स्वःताला अपडेट करून, एकरूप होऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध योजना व नव उपक्रम राबवायलाच हवे. प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक साधने :- (यापैकी कोणतेही दोन) १.सर्व शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक आहे . २.सर्व  शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक आहे .३.सर्व  शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन ड्राईव्ह असणे आवश्यक आहे . ४.सर्व शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे  ५.सर्व  शिक्षकांनी  किमान M.S.C.I.T पर्यंत संगणकीय शिक्षण घेणे आवश्यक आहे .  असे मत श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक  श्री बैले व्ही डी यांनी मांडले. सर्व शिक्षक बंधु भगिनी या उपक्रमासाठी अविरतपणे कष्ट घेत असल्याने  श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुपोषपाणी आर्य, सहसचिव अंजुमनीताई आर्य ,सचिव श्री संकाये साहेब ,उपाध्यक्ष श्री मुंडकर साहेब ,यांनी ई लर्निंग मध्ये  सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले