उदगीर येथे कोरोना बाधिताची संख्या 1 ने वाढली : आतापर्यंत 22 रुग्ण

उदगीर येथे कोरोना बाधिताची संख्या 1 ने वाढली : आतापर्यंत 22 रुग्ण
लातुर: कालपर्यंत 21 झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज आणखी एका रुगणाची भर पडली असून आता ती 22 वर पोचली आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 08.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 60 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 250 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 242 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 207 व्यक्तींचा Home Quarantine कालावधी समाप्त झाला असुन एकुण 43 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत २६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बीड 9, उस्मानाबाद 7, निलंगा 4 व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ९ असे एकुण 29 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 29 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 
 या संस्थेस सामुदायिक दसरा महोत्सव समिती व ट्रेडर्स असोसिएशन कृषी खात्याच्या वतीने 107 पी. पी. ई. कीटस् व ४० लिटर हॅण्ड सॅनिटायझर्स Donate केले यावेळी, श्री. प्रकाश पाटील वांजरखेडकर, श्री. निजाम शेख, श्री. व्यकंटेश हालिंगे, श्री. विष्णुजी भुतडा हे उपस्थित होते. तसेच शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला यांच्या वतीने कोविड आय. सी. सी. यु. साठी दोन Follor Beds या संस्थेस Donate केले यावेळी संस्थेचे सचिव श्री. बस्वराज धाराशिवे, सहसचिव श्री. महादेव खिचडे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, प्रा. दिनेश गुजराथी व प्रा. युवराज काटु उपस्थित होते.
 सद्यस्थितीत लातुरमध्ये कोरोना (कोविड19) चा एकही रुग्ण नसला तरी सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, घराबाहेर पडताना मास्क परिधान करुनच बाहेर पडावे. प्रवास करण्यापूर्वी बस स्थानक, रेल्वे स्थानक येथे नियुक्त केलेल्या डॉक्टरांकडुन तपासणी करुनच प्रवास करावा व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर, उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. मंगेश सेलुकर, उप अधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. उमेश लाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही