*समर्पण मध्ये नीट जेईई एमएच- सीईटी क्रॅश कोर्स आणि 12 वी विज्ञान सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस सुरू*
उदगीर: आज संपूर्ण देश कोरोनामुळे लॉकडाऊन आहे ही परिस्थिती आणखी किती काळ राहील हे कुणीही सांगणे शक्य नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे, हे टाळण्यासाठी लॉकडाऊन मधिल वेळ अभ्यासासाठी उपयोगात यावा, विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक ताण कमी व्हावा व सध्याच्या परिस्थिचा घरीच सुरक्षित राहुन समर्थपणे सामना करण्यासाठी व अखंडितपणे विद्यार्थ्याना शिक्षण देता यावे म्हणून स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त, अविनाश पाटील सरांची समर्पण करीअर इन्स्टिट्युट सज्ज झाली आहे. समर्पण मध्ये 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील नीट, जेईई आणि राज्य पातळीवरील एमएच- सीईटी-2020 या परीक्षांसाठी ऑनलाईन क्रॅश कोर्स व 12 वी विज्ञान मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस सुरू दिनांक 11 मे पासुन सुरू करण्यात येत आहेत. ऑनलाईन क्लास करण्यासाठी विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन सोबत फोरजी नेटवर्क असणे गरजेचे आहे. या ऑनलाईन क्लासेस चा सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन संचालक अविनाश पाटील यांनी केले आहे.
*समर्पण मध्ये नीट जेईई एमएच- सीईटी क्रॅश कोर्स आणि 12 वी विज्ञान सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस सुरू*