उदगीर येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  *जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह च्या 14 ऍक्टिव्ह केसेस

उदगीर येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 
*जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह च्या 14 ऍक्टिव्ह केसेस


लातूर,:- लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 65 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 230 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 222 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 200 व्यक्तींचा Home Quarantine कालावधी समाप्त झाला असुन एकुण 20 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 10 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची 48 तासानंर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व उर्वरीत ६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बीड येथील ९ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदोन प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हयात येणा़-या व जिल्हयाबाहेर जाणा़-या व्यक्तींसाठी नियमावली आदेशित केल्यानुसार त्या व्यक्तींची थर्मल स्कॅनींग व इतर आजार (खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास) तपासणी करुन बाहेर जिल्हयात जाण्यासाठी विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्र हे सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, लातुर महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व आरोग्य संस्था व लातुर जिल्हयातील सर्व नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या जवळील शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय किंवा नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायीक यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहान विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.


Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image