मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन

मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन



निलंगा : शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा असतानाही शहरातील नागरिकांना 15 दिवसाला पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करीत शहरातील रस्त्यांची अवस्थाही दयनीही झाल्याचे निवेदन शरद पवार विचार मंचच्या वतीने उपविभागीय अधिकायांना देण्यात आले आहे. 


 शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असुनही नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराला 8 दिवसातुन एकदा मिळणारे पाणी 15 ते 17 दिवसातुन एकदाच मिळत आहेत यामुळे लाँकडाऊन मध्ये घरी अडकलेली सर्व सामान्य जनता घरीच असल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. नविन पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते असुन अडचण नसुन खोळंबा आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेता शहरातील जनतेला चिखलातुनच जावे लागणार ,कचरा वेळेवर उचलला जात नाही,नाली सफाई बंद आहे यामुळे घाणीचे सामार्ज्य भरपुर प्रमाणात वाढले आहे या कडे नगर पालिका चे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. या मुळ गरजा वेळेवर भेटत नसल्यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून शहरातील जनतेची त्रासातून मुक्तता करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शरद पवार विचार मंच च्या वतीने देण्यात आला. ग्रामीण भागातही बोअर, विहिरी अधिगृहण कस्र्न पाण्याची सोय करावी असेही निवेदनात म्हणले आहे.


 या निवेदनात  शरद पवार विचार मंच तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे,तालुका उपाध्यक्ष अंगद जाधव, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडीया सेलचे प्रदेश सरचिटणीस किरण सोळुंके, वकील सेलचे तालुकाध्यक्ष अॅड. गोपाळ इंगळे, गफ्फार लालटेकडे,संदिप मोरे ,राम पाटील, रा. कॉ. किसान सेलेचे जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे, राजकुमार माने,लक्ष्मण क्षीरसागर, पंढरी पाटील, विकास ढेरे, मोरे, बालाजी शिंदे दयानंद मोरे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.


 


 


 


 



Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही