आज उदगीरच्या 16 जणांची तपासणी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह, तर निलंगा येथून चौघांची तपासणी सर्व निगेटिव्ह

आज उदगीरच्या 16 जणांची तपासणी


सर्वांचे अहवाल निगेटिव्ह, तर निलंगा येथून चौघांची तपासणी सर्व निगेटिव्ह


लातूर:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 29 मे 2020 रोजी एकुण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे निगेटिव्ह 12 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहे. 


*उपजिल्हा रुग्णालय, उदगीर* येथुन एकुण 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 04 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०4 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील 05 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 05 व्यक्तींचे निगेटीव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 38 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित, आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


*लातूर जिल्हा कोरोना अपडेट*


*जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या -119( शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील एका रुग्णाची नोंद उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे, मात्र उपचार लातूर येथे सुरू आहेत)


*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -56


*उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 61


*मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -03


*आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -01


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image