उदगीरच्या 17 जणांची तपासणी 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 2 प्रलंबित* *निलंगा येथील 25 जणांच्या तपासणीअंती 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित*

*उदगीरच्या 17 जणांची तपासणी


15 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 2 प्रलंबित*


*निलंगा येथील 25 जणांच्या तपासणीअंती 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित*


लातूर:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 22 मे 2020 रोजी एकुण 148 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्या सर्व 23 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. जळकोट येथुन 4 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी चारही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 23 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत मुरुड येथील एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे असे लातुर जिल्हयातील एकुण 71 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 67 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 


*बीड व उस्मानाबाद*


बीड जिल्हयातील 42 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. तर उस्मानाबाद जिल्हयातील 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 10 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 


असे एकुण आज 148 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 127 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 21 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयास राज्य शासनाची मंजुरी* *उदगीरकरांची महाराष्ट्रात एम.एच. - ५५ ही नवी ओळख* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image