माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.

 माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा.


उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.

उदगीर : शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नगर परिषद, उदगीर व अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधर अभियानांतर्गत दोन गटातून रंगभरण व निबंध स्पर्धा दि. २७ फेब्रुवारी २०२१ शनिवारी दुपारी १२ वाजता विद्यावर्धिनी हायस्कूल, उदगीर येथे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली.
इयत्ता ५ वी ते ८ वी साठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन व संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा स्त्रोत (सौर व वारा), प्लास्टिक बंदी कामाची गरज आदी विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम ५०००/- रू, ३०००/- रू. , २०००/- रू. व उत्तेजनार्थ एकूण १० पारितोषिक १०००/- रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरूप ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. सदरील स्पर्धांसाठी चित्र व कागद संयोजकांकडून पुरविले जाईल. कोरोनाचे सर्व नियम पाळून या स्पर्धा होणार आहेत. तेंव्हा शहरातील जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल पठाण, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, चंद्रदीप नादरगे, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योतीताई डोळे, रामेश्वर पटवारी, संदीप कानमंदे, रामेश्वर चाटे, विजय रकटे यांच्यासह न. प. चे सभापती, सदस्य व कर्मचाऱ्यांनी केले आहे.
Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image