कोरोना पॉझिटिव असलेल्या सर्व रुग्णांची तब्येत चांगले असल्याने 19 मे पर्यंत सर्वांना घरी सोडण्यात येईल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

कोरोना पॉझिटिव असलेल्या सर्व रुग्णांची तब्येत चांगले असल्याने
19 मे पर्यंत सर्वांना घरी सोडण्यात येईल
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


लातूर, :- उदगीर शहरात सद्यस्थितीत 17 कोरोना पॉझिटिव्ह च्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यातील चार रुग्णांपैकी तीन रुग्णांची प्रकृती चांगली आहे व एका रुग्णाचे स्वाब तपासणीला पाठवण्यात आलेले आहे. तरी या सर्व चारही रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. तर उर्वरित तेरा पॉझिटिव्ह रुग्णांना केंद्र शासनाच्या नवीन सूचनेप्रमाणे प्रकृती चांगली असल्याने व त्यांच्या covid-19 चे कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने त्या सर्व 13 रुग्णांना 19 मे 2020 पर्यंत घरी सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे आदी उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 37 कोरोना पॉझिटिव केसेस झाल्या. सद्यस्थितीत त्यातील 17 ॲक्टिव्ह केसेस आहेत यापूर्वी निलंगा येथे आलेले आठ यात्रेकरू त्यांच्यावर उपचार करून ते कोरोनामुक्त झालेले आहेत. केंद्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे दोन दिवसांपूर्वी उदगीर येथील अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तरी याच नियमानुसार आज चार रुग्णांना डिस्चार्ज मिळू शकतो तर उर्वरित सर्व 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 19 मे 2020 पर्यंत घरी जाऊ शकतील असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या तिसऱ्या लॉक डाउनच्या सुरुवातीच्या काळातच प्रशासनाच्या वतीने सर्व शहरी भागातील आस्थापना दुकाने सुरू राहावेत यासाठी त्या दुकानांना ठराविक वार ठरवून दिले त्यामुळे एक तर गर्दी कमी प्रमाणात होईल व एकाच रांगेतील कमी दुकाने सुरू होऊन भौतिक अंतर पाळले जाईल हा उद्देश होता. तो बहुतांश प्रमाणात योग्य असून यामध्ये आणखी काही बदल करावयाची असतील तर प्रसार माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी सूचना करण्यास हरकत नाही असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. तसेच जिल्हा प्रशासनाने आस्थापना व दुकानासाठी अल्टरनेट वार ठरवून दिलेले आहे. याचे शेजारील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या जिल्ह्यात लागू करण्याबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे व या पध्दतीचे त्यांनी कौतुक ही केले असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.
औरंगाबाद येथून उत्तर प्रदेश राज्यात ट्रेन जाणार आहे त्या ट्रेनमध्ये लातूर जिल्ह्यातील दोनशे मजुरांना पाठविण्यात येत आहे तसेच लातूर जिल्ह्यात जवळपास हजार मजूर युपी बिहारचे आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती अधिकारी श्रीकांत यांनी दिली
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात अडकलेले पर जिल्हा व पर राज्यातील मजूर विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी गुगल फॉर्म ची व्यवस्था करण्यात आली. त्यावर ऑनलाइन पद्धतीने 13 हजार 590 लोकांची नोंदणी झालेली आहे तर आत्तापर्यंत 7 हजार 677 पर जिल्हा व पर राज्यातील मजूर विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आलेले आहे. उर्वरित 5 हजार 913 लोकांना पाठविण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील युपी-बिहार मधील दोन हजारपेक्षा अधिक मजूर असून त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रेन ची व्यवस्था करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील 920 व्यक्तींना संस्था विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आलेला असून सद्यस्थितीत 280 व्यक्ती या कक्षात आहेत तसेच 390 व्यक्तींना त्यांच्या घरीच विलगीकरण मध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील 136 व्यक्तींचा विलगीकरण कालावधी समाप्त झालेला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. तसेच आजही अंदाजे चार व्यक्तींना याच नियमाप्रमाणे घरी सोडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती डॉ. ढगे यांनी दिली.
 यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनीही कोरोनाच्या अनुषंगाने माहिती दिली. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यात उपलब्ध असलेले बी-बियाणे खतांचा साठा याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही जिल्ह्यात बी बियाणे व खतांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही