फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी  20 मे 2020 पर्यंत अर्ज करावेत

फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 
20 मे 2020 पर्यंत अर्ज करावेत


लातूर, : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अति महत्वाकांक्षी योजना आहे. वैयक्तीक लाभार्थीच्या शेतावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २० मे २०२० पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत. 
फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा ७/१२, ८-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदी कागद पात्रांचा समावेश आहे. सदर योजने अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचे ऑनलाईन सनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात अली आहे. 
या योजनेमध्ये योजना निहाय फळपिकांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये आंबा कलम, आंबा रोपे, चिकू, पेरू, डाळिंब, मोसम्बी, संत्रा, लिंबू आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे .लाभार्थीची निवड वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्र रेषेखालील लाभार्थी, भु-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, स्री करता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, २००६ खालील लाभार्थी आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्या नंतर कृषी कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, २००८ यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमीनीवरील कामांना, शर्तीच्या अधिनतेने प्रधान्य देण्यात येईल.
शेतकऱ्यांनी आपले कर्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी लातूर यांनी केले आहे.