30 एप्रिल रोजी प्रलंबित असलेल्या 45 पैकी एक अहवाल पॉझिटिव्ह, तर 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व दोन व्यक्तींच्या अहवालाची पुनर्तपासणी होणार

30 एप्रिल रोजी प्रलंबित असलेल्या 45 पैकी एक अहवाल पॉझिटिव्ह, तर 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व दोन व्यक्तींच्या अहवालाची पुनर्तपासणी होणार


* 1 मे रोजी चे उदगीर येथील 29 पैकी 27 अहवाल निगेटिव्ह तर 2 व्यक्तींचे अहवालाची पुनर्तपासणी होणार



लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी एकूण 45 व्यक्तींच्या स्वॅबची कोविड-19 ची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. प्रलंबित तीन आवाहल पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, 
अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
आज दिनांक 01 मे 2020 रोजी एकूण 53 व्यक्तींचे स्वॅब (कोविड 19) तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत आले होते. त्यापैकी उदगीर येथील 29 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 27 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपसणी करण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद येथील 20, अंबाजोगाई येथील 2 व लातूर येथील 2 व्यक्तीचे स्वॅब तपासणी साठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे कोणताही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज