उदगीरच्या 51 जणांच्या तपासणीत 44 निगेटिव्ह, 5 पॉझिटिव्ह
लातूर:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत.
एकुण 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 4 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चारही रुग्ण काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मुलीच्या कुटुंबातील आहेत व एम. आय. डी. सी. हडको येथील असून त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे.
अहमदपूर येथुन 11 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत. निलंगा येथून 5 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 5 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 5 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 110 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 93 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 6 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
*बीड*
तसेच बीड जिल्हयातील 40 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 33 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे.
*उस्मानाबाद*
उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत .
असे एकुण आज 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 161 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 23 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 13 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा