उदगीरच्या आठ जणांचे स्वॅब तपासणीत ६ जणांचे निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल प्रलंबित विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणी 

उदगीरच्या आठ जणांचे स्वॅब तपासणीत ६ जणांचे निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल प्रलंबित
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणी 


लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. किल्लारी येथील ३ व्यक्ती चे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आहेत. चाकुर येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आले होते त्या व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. 
बीड येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व १७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 4 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 15 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत असे एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 43 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 18 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली. 


 


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज