निलंगा तालुक्यातील वाळू तस्करी रोखा शरद पवार विचार मंचने केली मागणी

निलंगा तालुक्यातील वाळू तस्करी रोखा


शरद पवार विचार मंचने केली मागणी


निलंगा : या तालुक्यातील वाळु ,काळी माती, तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या मागणीसह कोरोना च्या पाश्वभूमीवर शेतकरी वर्गास बांधावर बी बियाणे व खरेदी केंद्र चालु करण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना शरद पवार विचार मंच निलंगा च्या वतीने निवेदन देण्यात आले. 


निलंगा तालूक्यातील मांजरा,तेरणा नदिपात्रातील वाळूचा उपसा अवैधरीत्या होत आहे. हजारो रूपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे व वाळू उपसा करणारे अवैधरीत्या वाळूची साठवणूक करत आहेत त्याच बरोबर वाळू तीन ते पाच हजार रूपये प्रती ब्रास विकत आहेत यांच्या वर योग्य ती कारवाई होवून नदीपात्रातील वाळू उपसा बंद करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी चालना द्यावी . तालुक्यातील तेरणा मांजरा नदीपात्र लगत असलेल्या थडीची व घळीघळीच्या क्षेत्रात उत्खनन करून माती अवैधरीत्या विक्री केली जात आहे तसेच शिरसी हंगरगा तलावातील नाल्याच्या पात्राशेजारी शासनाने पाणी साठवण्यासाठी शेतकऱ्याचा जमिनीचा मोबदला देवून ताब्यात घेतलेल्या क्षेत्रातील मातीचा उपसा होत आहे आणि त्यामातीखाली वाळू मिळत आहे त्याचाही उपसा अति प्रमाणात होत आहे ,पावसाळ्यात पावसाचे प्रमाण सरासरी एवढे झाले तर तलावात साठवणीच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठवण होवून तलावास धोका र्निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी संबंधीतावर कारवाई करावी


शासनाने हमीभावानुसार खरेदीकेंद्राद्वारे तुर, हरभरा धान्याची खरेदी करून एक महिन्याचा कालावधी झाला आहे,आजपर्यंत शेतकर्याला त्याच्या विक्री केलेल्या मालाच्या पैशाचे चुकारे/मोबदला खरेदीनंतर आठ ते पंधरा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे असताना सुद्धा पैसै मिळाले नसल्यामुळे येत्या खरीप हंगामाचे बी बियाणे खते खरेदी करण्यास अडचणीचे ठरणार आहे यासाठी शासनाने खरेदीकेंद्राद्वारे खरेदी केलेल्या तुर/हरभरा धान्याचा मोबदला लवकरात लवकर मिळवून द्यावा,खत / बियाणे बांधावर उपलब्ध होतील असे शासन निर्णय होवून सुद्धा खत/ बी बियाणे विक्रेते शेतकरी गटास/शेतकरी समुहास खते देण्यास टाळाटाळ करत आहेत, गटाने खरेदी नकारता वैयक्तिक खरेदी करा असे म्हणत आहेत अश्या विक्रेत्या वर संबंधित विभागाकडून त्याच्या दैनंदिन व्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी 


कोरोना विषाणू चा संसर्ग होवू नये म्हणून (लाॅकडाउनमध्ये)परवानाधारक देशी, विदेशी मद्य/दारू विक्रेत्याचे दुकाने शासनाने विक्री करण्यास बंद केली आहेत अश्या काळातही जवळपास सर्व दुकानदारानी साठा रजिस्टर मध्ये तफावत दाखवून चढ्या भावाने मद्य विक्री केली आहे, अशा दुकानाच्या साठा रजिस्टर मधील व फेब्रुवारी/मार्च महिन्यात आलेल्या मद्याचा साठा व मार्च महिन्यात आलेले मद्य तसेच माहे मार्च महिन्यात 20तारखेपर्यंत दर दिवशी झालेली मद्य विक्री यानंतर झालेली मद्य विक्री ची तपासणी करून संबंधितावर कारवाई करावी,तालूक्यातील अवैधरीत्या दारू विक्री व मटका जुगार चालू असलेले बंद करून विक्री करणार्यावर व संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी. मुंबई,पुणे,औरंगाबाद,नाशिक व ईतर जिल्ह्यातून व परराज्यातून परवाना व विनापरवाना प्रवास केलेल्या व्यक्ती चे


स्वॅब तपासणी करावी व ग्रामपंचायतीना/ग्रामसमितीना त्या व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत व इतरांच्या संपर्कात येणार नाहीत यासाठी दक्षता घेण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी पोलिस पाटील यांना सुचित करावे. महोदय साहेबांनी वाळू, काळीमाती अवैधरीत्या उपसा करणाऱ्यावर तसेच शेतकरी गट/समूह यांना खते न देणाऱ्या विक्रेत्यावर , दारू विक्रीते, मटका जुगार चालविणारा कारवाई करावी, परजिल्हा(रेड/ऑरेंज झोन) परराज्यातून (रेड/ऑरेंज झोन) येणार्या प्रवाशांची स्वॅब तपासणी करावी व तुर/हरभरा शासनमान्य खरेदीकेंद्राकडे विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या मालाचे पैसे लवकरात लवकर मिळवून द्यावे अशा मागणी चे पत्र देण्यात आले


सदर कारवाई संदर्भात माहिती. पालकमंत्री मा.ना.अमितजी देशमुख साहेब, पालकमंत्री लातूर जिल्हा.मा.ना.संजयजी बनसोडे साहेब, पाणीपुरवठा , रोहयो व पर्यावरण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी लातुर यांनाही तात्काळ कारवाई करिता पत्र पाठवून लवकरात लवकर कारवाई ची मागणी करण्यात आली आहे. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक (आण्णा) बगदुरे,सुधीर मसलगे-ता.अध्यक्ष, अंगद जाधव-ता.कार्याध्यक्ष, धम्मानंद काळे- निलंगा शहरअध्यक्ष रा.यु.काँ.पार्टी व श.प.विचार मंच निलंगा शहर, गोपाळ इंगळे-ता.अध्यक्ष वकील सेल, किरण सोळूंके- प्रदेश सरचिटणीस सोशल मिडिया रा.काँ.पार्टी, संदीप मोरे-मा.ता.अध्यक्ष रा.काँ पार्टी निलंगा, राम पाटील-मा.ता.कार्याध्यक्ष रा.काँ.पार्टी निलंगा,गफार लालटेकडे-ता.अध्यक्ष ग्राहक सेल रा.काँ.पार्टी निलंगा, सुरेश रोळे- जिल्हा सरचिटणीस किसान सेल रा.काँ.पार्टी,लक्ष्मण क्षीरसागर-ता.उपाध्यक्ष, राजकुमार माने, पंढरी पाटील, विकास ढेरे, दयानंद मोरे आदीच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.


Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image