आर्ट ऑफ लिव्हींगकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप  

आर्ट ऑफ लिव्हींगकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप


 


उदगीर : सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्यामुळे समाजातील गोरगरीब लोकांची उपासमार होत असल्याने विविध सामाजिक संघटना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी पुढे येत आहेत. येथील श्रीश्री रविशंकरजी प्रणित असलेल्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातूनदेखील अशाच गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.


 


आर्ट ऑफ लिव्हींगच्या उदगीर येथील प्रशिक्षीका रचना उळागड्डे यानीही सामाजिक दायित्व स्वीकारत आर्ट ऑफ लिव्हंीगच्या टीमच्या सहकार्यातून उदगीर शहरासह तालुक्यातील लोणी, तोंडार, तोंडार पाटील, सोमनाथपूर, अतनूर, रामपूर तांडा, नेत्रगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील गरजवंत नागरिकांना अन्नधान्याचे कीट देण्यात आले. 


 


 आर्ट ऑफ लिव्हींगच्या वतीने दिले गेलेल्या कीटमध्ये गहू, तांंदूळ, तुरदाळ आदी जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे. 


 


 रचना उळागड्डे यांच्यसमवेत राजेश अंबरखाने, लक्ष्मीकांत स्वामी, गिरीष गर्जे, अनारगट्टे यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हींगच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. 


 


 


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज