क्रिडाई बिल्डर्सच्या वतीने कोव्हिड रुग्णालयास पीपीई किटचे वाटप
--
उदगीर: येथील कोविंड रुग्णालयास उदगीर क्रिडाई बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांसाठी पन्नास सुरक्षारक्षक पीपीई किटचे वाटप उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिष हरिदास, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार उपस्थित होते. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संस्था पुढे येऊन अडचणीत असलेल्या घटकांना मदत करण्याचे काम करीत आहेत.
या क्रीडाई बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य सेविकांनी कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचा निर्णय घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या डॉक्टर्सना या किटचे वाटप केले. यावेळी संघटनेचे सचिव अजय पाटील, शिवाजी बिरादार, शिवकुमार पांडे, प्रशांत जगताप, बाळु पारसेवार यांच्या उपस्थितीत असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांच्या वतीने या कीडचे वाटप करण्यात आले.
क्रिडाई बिल्डर्सच्या वतीने कोव्हिड रुग्णालयास पीपीई किटचे वाटप
addComments
टिप्पणी पोस्ट करा