*आरोग्य आणि शेती प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घ्यावी* *भाजपाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी*

*


लातूर: आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


लातूर जिल्ह्यात कोरोना मोठे रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर मान्सून अगदी काही दिवसावर आल्याने शेतकऱ्यांना लागणारे खत बी बियाणे वेळेवर आणि गरजेनुसार मिळणे आवश्यक आहे. मात्र बाजारात खत आणि बियाण्याची अधिकच्या भावाने विक्री होत होत असल्याने गळेच काळाबाजार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यासाठी आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, जि.प. चे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज