परराज्यातील मजुरांना गावी परतण्यासाठी मोफत प्रवासाची सोय लाभ घेण्याचे तहसीलदार मुंडे यांचे आवाहन

परराज्यातील मजुरांना गावी परतण्यासाठी मोफत प्रवासाची सोय
लाभ घेण्याचे तहसीलदार मुंडे यांचे आवाहन
उदगीर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उदगीर शहरात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना आपल्या गावी परत जाण्यासाठी शासनामार्फत मोफत प्रवासाची सोय करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार,कर्नाटक, तेलंगणा, आदींसह अन्य राज्यातील मजूर उदगीर शहर व परिसरात अडकले आहेत. अशा अडकलेल्या मजुरांना आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी त्यांची मोफत प्रवासाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहेत अशा मजूर लोकांची किंवा व्यक्तींची यादी तयार करून तहसील कार्यालय निवडणूक शाखेत अथवा व्यवस्थापक बस स्टँड उदगीर यांचेशी संपर्क करावा. त्यानंतर संबंधित मजुरांना मोफत बस सेवेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सीमेवर पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे.