उदगीर : एकुर्का रोड येथील समर्थ चे विद्यार्थी गिरविताहेत शिक्षणाचे धडे.

ऑनलाईन लेक्चरची सुविधा देणारी ग्रामीण भागातील पहिली शाळा. 


उदगीर : एकुर्का रोड येथील समर्थ चे विद्यार्थी गिरविताहेत शिक्षणाचे धडे.


उदगीर : कोरना महामारीचे वैश्विक संकट अवघ्या जगासमोर उभे टाकले असून अवघ्या काही दिवसात जग स्तब्ध झाले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पडल्याने शाळां शाळातून किलबिलणारी भावी पिढी चार भिंतीआड कैद झाली. सुट्टी म्हणावी तर घराबाहेरची मैदानेही बंद झालेली. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड या ग्रामीण भागातील समर्थ विद्यालयातील शिक्षकांनी लॉकडाऊन चा सदुपयोग करत ऑनलाईन लेक्चरचा मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे स्वत: प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
तालुक्यातील एकुर्का रोड या ग्रामीण भागातील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ही शहरी भागातील मुलांबरोबर शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून नेहमी वेगवेगळे उपक्रम येथे राबविण्यात येत असतात. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पडल्यामुळे सर्वच व्यवहार थांबून आहेत. यात शाळा ही अपवाद नाही. म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठी समर्थ 
विद्यालयात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क करत स्टडी फॉर्म होम या उपक्रमात विद्यार्थ्यांना गुगल, व्हाईस रेकार्डिग, व्हिडिओ काँन्फरन्स, दिक्षा अँप, झुम अँप, युट्युब इ.च्या माध्यमातून दररोज अध्यापन तर केले जातेच शिवाय तंत्रस्नेही बनून नवनवे प्रयोग करण्यासाठीही प्रेरणा दिली जात आहे. सध्या इयत्ता १० वी चे नियमित तासिका होत आहेत. पुढील आठवड्यात इयत्ता आठवी, नववी, अकरावी व बारावीचे कला, विज्ञान व होकेशन कोर्स चे नियमित तासिका घेतल्या जाणार असल्याची माहिती प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी दिली. दहावी च्या विद्यार्थ्यांना या नाविण्यपूर्ण उपक्रमाने लॉकडाऊन मध्ये दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या ऑनलाईन शिकवणी उपक्रमात अमर जाधव, प्रदीप केंद्रे, किरण हाळीघोंगडे,  निजलिंग मठवाले सहभागी झाले आहेत. यासाठी प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी.एस. बाबळसुरे, रसूल पठाण यांचे ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे.


 


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज