लाँकडाऊनमध्येही आँनलाईन माध्यमातून स्टडी फ्राँम होम....

लाँकडाऊनमध्येही आँनलाईन माध्यमातून स्टडी फ्राँम होम....



कोरना महामारीचे वैश्विक संकट अवघ्या जगासमोर उभे टाकले असताना अवघ्या काही दिवसात जग स्तब्ध झाले.लाँकडाऊन होऊन शाळांशाळातून किलबिलणारी भावी पिढी चार भिंतीआड कैद झाली.सुट्टी म्हणावी तर घराबाहेरची मैदानेही बंद झालेली .या अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लालबहादूर शास्त्री विद्यालयातील प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका अनिता यलमटे  यांनी विद्यार्थ्यांच्या या घुसमटीचा अनोखा व अनोखा अभ्यासक्रमाचा मार्ग निवडला तो म्हणजे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क करत 'स्टडी फॉर्म होम.' या उपक्रमात विद्यार्थ्यांना गुगल,व्हाईस रेकार्डिग,व्हिडिओ काँन्फरन्स,दिक्षा अँप,झुम अँप ,युट्युब इ.च्या माध्यमातून दररोज अध्यापन तर केले जातेच शिवाय तंत्रस्नेही बनून नवनवे प्रयोग करण्यासाठीही प्रेरणा दिली जात आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाने लाँकडाऊनमुळे कंटाळलेले विद्यार्थी नवे काही तरी शिकत असल्याची अनुभूती घेत आहेत तर पालकही आपली मुले वर्क फ्राँम होम ' करत बहूआयामी बनत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत.अनिता यलमटे यांच्या या उपक्रमात मुख्याध्यापक संजय विभूते,उपमुख्याध्यापक प्रदिप कुलकर्णी ,अंबूताई दीक्षित,प्रिती शेंडे,रागिनी बर्दापूरकर व राजकुमार म्हेत्रे यांचे ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज