रोगप्रतिकार क्षमता वृद्धीकारक आयुर्वेदिक-काढा(औषधी)च्या मोफत वितरण शिबिराचे उद्घाटन संपन्न*

*रोगप्रतिकार क्षमता वृद्धीकारक आयुर्वेदिक-काढा(औषधी)च्या मोफत वितरण शिबिराचे उद्घाटन संपन्न*
उदगीर: धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर आणि रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालय,भारत सरकार आणि भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद,नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निरोगी,अन्य आजार असणाऱ्या व्यक्तींना व तसेच कोरोना संशयित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेद शास्त्रातील विविध संदर्भांचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या आयुष काढा(औषधी)च्या मोफत(निःशुल्क)वितरण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार शिवराज तोंडचीरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य रो.डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,रो.डाॅ.बाळासाहेब पाटील,डाॅ.प्रशांत चोले,वैद्यकीय अधिकारी गट-अ डॉ.कमल चामले,वाढवणा येथील पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एडके,डॉ.आश्रुबा जाधव,डाॅ.स॔दीप मुसणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार शिवराज तोंडचीरकर म्हणाले की विविध संसर्गजन्य आजार व्याधींचा प्रसार व त्याचे शरीरावर दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीला अनुरूप आहार व नियमित व्यायाम आणि तसेच योग-प्राणायम करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. 
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मधुमेह,उच्च रक्तदाब,ह्दयरोग, कॅन्सर यासारखे अन्य दुर्धर आजार,कुपोषणजन्य समस्या,विविध जीवनसत्वे-प्रथिन युक्त आहाराचे अनियमित सेवन टाळुन फास्टफूड व जंक फूडचे अनियंत्रित सेवन टाळुन,व्यसनाधीनता,वार्धक्यजनीत विविध आजार या सर्व या बाबींचा विचार करता या आयुर्वेदिक औषधी चे सेवन निश्चितपणे उपयोगी पडेल.
अध्यक्षीय समारोपात डाॅ.दत्तात्रय पाटील म्हणले की स्थानिक पातळीवरील आवश्यकतेनुसार सर्वांनीच सांगितल्यामुळे अश्वगंधा चूर्ण,गुडूची चुर्ण,यष्टिमधु चूर्ण,सितोपलादी चूर्ण,तालिसादी चूर्ण,त्रिकटू चूर्ण,कंटकारी चूर्ण,वासा चूर्ण,दालचिनी चूर्ण यासारख्या विविध औषधींचे वेगवेगळे तीन मिश्रण बनवून ते सकाळी- दुपारी-संध्याकाळी या पद्धतीने तीन वेळा घरीच काढा तयार करून घ्यावे यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी निश्चितपणे लाभ होईल. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ.बालाजी कट्टेवार यांनी तर आभार प्रदर्शन रो.डॉ.महेश जाधव यांनी केले.
याप्रसंगी कोरोना कम्युनिटी क्लिनिकचे डॉ.ज्ञानोबा केंद्रे,डॉ.सुनील बनशेळकीकर,डाॅ.अजित पाटील,डॉ.सादिक पटेल,डॉ.अशपाक बागमारू आणि तसेच सामान्य रुग्णालयाचे डाॅ.गणेश चव्हाण,डॉ.रेणुका पाटील व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे रो.डाॅ.एस.आर.श्रीगिरे, डाॅ.उषा काळे, डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,डाॅ.अविनाश जाधव,डाॅ.सचिन टाले आदि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज