इतर प्रवासाकरीता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मोफत असणार नाही

इतर प्रवासाकरीता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची
बस सेवा मोफत असणार नाही
लातूर,:- लॉकडाऊन मधील कालावधीत शासन निर्णयाव्दारे राज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 
 संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आदेश केवळ पुढील नमूद केलेल्या दोन परिस्थितच लागू राहतील. इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेली असतील त्यांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यातून महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आलेले आहेत त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्हयापर्यंत पोहोचविण्याकरीता .
 याशिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा मोफत उपलब्ध्‍ असणार नाही . या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर सर्व अटी व शर्ती लागू असतील असे ही शासन निर्णयात नमूद केले आहे.