शिवाजी महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार संपन्न

शिवाजी महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार संपन्न
उदगीर : शिवाजी महाविद्यालयात दिनांक 10 मे रोजी दुपारी 5:00ते 7:00 या वेळेमध्ये ऑनलाइन वेबिनार संपन्न झाले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव यांनी वेबिनार चे उद्घाटन केले आणि आणि सर्व ऑनलाईन सहभागी प्राध्यापकांना सहभागी झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या. संशोधनात नमुना निवड पद्धत महत्त्वाची असून त्याची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा वेबिनार महाविद्यालयाने आयोजित केला आहे असे त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.
या वेबिनार साठी महाराष्ट्रातून 167 प्राध्यापक तर महाराष्ट्राच्या बाहेरून 40 प्राध्यापक सहभागी झाले होते .साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. रामचंद्र भिसे यांनी नमुना निवड तंत्राच्या प्रकारावर सविस्तर प्रकाश टाकला. संशोधकांनी नमुना निवडीच्या प्रकारांचा उपयोग करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल ची माहिती उदाहरण देऊन स्पष्ट केली . साधनव्यक्ती प्रा.डॉ.रामकिशन मांजरे यांनी नमुना निवडीच्या प्रकाराबद्दल माहिती दिली, तसेच विविध गणितीय सूत्राचा वापर नमुन्याच्या आकाराचे निर्धारण करण्यासाठी कसा करावा हे उदाहरणासह स्पष्ट केले.
या वेबिनार चे सूत्रसंचालन समन्वयक व ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक विष्णू पवार यांनी केले, तसेच या वेबिनार चे आभार प्रदर्शन सहसमन्वयक प्रा. डॉ. अनुराधा पाटील व प्रा. डॉ. किरण गुट्टे यांनी केले .सदरील वेबिनार यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक विष्णू पवार व सहसमन्वयक डॉ.अनुराधा पाटील यांनी परिश्रम घेतले. हा वेबिनार यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. विजयकुमार पाटील शिरोळकर व सचिव माननीय ज्ञानदेवजी झोडगे यांनी अभिनंदन केले आहे.