राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक 
सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
लातूर:- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने दि. 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन (टाळेबंदी) जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छीत स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु इच्छीणाऱ्या नागरिकांना रा प महामंडळाकडून मोफत वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी रा प लातूर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी दुरध्वनी क्र. 02382-228991 यावर संपर्क साधण्यात यावा. 
 विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
 विभाग नियंत्रक स.भा. क्षिरसागर मो.नं.9422548204, दुरध्वनी क्र. 02382-228994, विभागीय वाहतूक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सं.प. साळुंके मो.नं. 9822409932, दुरध्वनी क्र. 02382-228991, आगार प्रमुख लातूर ज.फ.कुरेशी मो.न.9421321565 दुरध्वनी क्र.02382-243626, आगार प्रमुख उदगीर य.मा.कानतोडे मो.नं.9881671293, दुरध्वनी क्र.02385-256156,आगार प्रमुख अहमदपूर स.ग. सोनवणे मो.नं.9028066005, दुरध्वनी क्र.02381-262278, आगार प्रमुख निलंगा यु.भा. थडकर मो.नं.9922850099, दुरध्वनी क्र.02384-242013, आगार प्रमुख औसा अ.द. गायकवाड मो.नं. 9860794194, दुरध्वनी क्र. 02383-222049 असे विभाग नियंत्रक रा प लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज