लातूर 112 पैकी 88 निगेटिव्ह 14 पॉझिटिव्ह 10 Inconclusive पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उदगीरच्या दोघांचा समावेश

लातूर 112 पैकी 88 निगेटिव्ह 14 पॉझिटिव्ह 10 Inconclusive


पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उदगीरच्या दोघांचा समावेश


लातूर: लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकूण 112 जणांची स्वब तपासणी करण्यात आली. यात 88 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 10 जणांचे अहवाल इंक्लुझिव्ह आले असून पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उदगीरच्या दोघांजनाचा समावेश आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 35 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 24 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. 


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 02 व्यक्ती नारायण नगर, मजगे नगर, शाम नगर येथील व एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. 


महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 05 व्यक्ती दयाराम रोड व एक व्यक्ती शाम नगर लातूर येथील आहे


उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 05 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 02 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली एक व्यक्ती येरमे नगर येथील आहे व दुसरी व्यक्ती अर्सनाल ता. उदगीर येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज