लातूर 189 पैकी 165 निगेटिव्ह 17 पॉझिटिव्ह 07 Inconclusive.
उदगीरच्या 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
लातूर : आज लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील एकूण 189 जणांचे स्वब तपासण्यात आले. यात एकूण 165 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 जणांचे अहवाल इंक्लुझिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये उदगीरच्या 7 जणांचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 66 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती श्याम नगर, खंडोबा गल्ली पाच नंबर चौक लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एक व्यक्ती बलसुर ता. उमरगा येथील आहेत.
महानगरपालिकेकडून 21 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 66 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 59 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 07 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा