महासभेच्या वतीने पाच हजार घरात होणार होमिओपॅथी औषधी च वाटप : कोविड 19 योद्धा-डॉ .संतोष कोटलवार यांचे सहकार्य  

महासभेच्या वतीने पाच हजार घरात होणार होमिओपॅथी औषधी च वाटप


कोविड 19 योद्धा-डॉ .संतोष कोटलवार यांचे सहकार्यउदगीर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सध्याच्या परिस्थितीत आर्सेनिक अल्बम 30 ही होमोओपॅथि औषध प्रतिकार शक्ती(immunity power) वाढविण्यास मदत करते आणि कोरोना होण्या पासून परावृत्त करते .ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र आर्य वैश्य महारासभा सुमारे पाच हजार घरात ही औषधी वाटप करणार असूनउ दगीर येथील प्रसिद्ध होमोओपॅथिक डॉक्टर संतोष कोटलवार यांनी सदर औषधी मोफत उपलब्ध करून देणार आहेत 


 दरम्यान डॉ कोटलवार यांनी आर्यवैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA)च्या माध्यमातून उदगीर येथील सर्व पोलीस अधिकारी ,कर्मचारी व कुटुंबियासाठी आर्सेनिक अल्बम चे मोफत वाटप केले त्याचा फायदा 2000 व्यक्तीला झाला,तसेच उदगीर येथील पत्रकार बांधव आणि कुटुंबियासाठी औषधांचे वाटप केले.


त्यानंतर त्यांनी मानव सेवा हीच ईश्वर समजून महाराष्ट्रातील समाजबांधवा साठी 5000बॉटल म्हणजेच 20000 लोकांसाठी होमिओपॅथीक औषध अव्होपा उदगीरच्या पुढाकाराने व महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेमार्फत मोफत वाटप करण्याचा संकल्प करून औषधी वितरणासाठी महासभेकडे सुपूर्द केल्या आहेत


          ज्यांनी आजतागायत होमिओपॅथीच्या माध्यमातून अत्यंत जर्जर असे रोग बरे करून लाखो लोकांना वेदनेतून मुक्ती दिली.मुतखडा, कॅन्सर,मूळव्याध, अपेनडिक्स, स्त्री रोग याबाबत चमत्कारिकरित्या उपाययोजना करून लोकांना बरे केले.हे करत असताना जगाच्या या वैश्विक कोरोनाच्या महामारीमध्ये पैसे कमावणे हे ध्येय न ठेवता सेवा म्हणून कार्य करत आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप केले.या कार्याबद्दल आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी त्यांचे आभार व्यक्त करून ही समाजाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे असे म्हणाले , तसेच महासभेचे प्रसिद्धी प्रमुख तथा आर्यवैश्य आरक्षण समितीचे अध्यक्ष प्रदीप कोकडवार,राज्य कार्य सदस्य गजानन चिद्रेवार, विजयकुमार पारसेवार, आर्यवैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.दीपक चिद्दरवार,सचिव प्रा.सुनील वट्टमवार कोषाध्यक्ष बाळाजी बुन्नावार,उपाध्यक्ष तानाजी चंदावार,तसेच अव्होपाचे सर्व सभासद यांनी डॉ.संतोष कोटलवार यांच्या कार्यबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image