जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन चे आदेश: जिल्हयात 29 जून ते 31 जूलै 2020 पर्यंत कलम 144 लागू

*जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन चे आदेश*


*जिल्हयात 29 जून ते 31 जूलै 2020 पर्यंत कलम 144 लागू*


 


लातूर : कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दि. 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते. तद्नंतर महाराष्ट्र शासनाचे दिनांक 29 जून 2020 रोजीचे आदेशान्वये दिनांक 31 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ची श्रीकांत यांनी कळविले आहे.


 कोरोना विषाणू (कोव्हिड-19) प्रार्दुभाव व प्रसार टाळण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये लातूर जिल्हयात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना वगळून 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणेस या आदेशाव्दारे मनाई करीत असून महाराष्ट्र शासनाचे दिनांक 29 जून 2020 रोजीचे आदेशान्वये निर्देशीत केल्यानुसार खालील बाबीसंदर्भात शिथिलता राहील, असे जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी निर्देशीत केले आहे.


 विवाह विषयक समारंभ, खुल्या जागा व नॉन ए.सी. हॉल या ठिकाणी या कार्यालयाचे आदेश दिनांक 10 जून 2020 व शासन आदेश दिनांक 23 जून 2020 मधील निर्देशानुसार परवानगी राहील. आस्थापना व्यतिरिक्त इतर कामकाजासाठी जसे इंटरनेटव्दारे शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण करणे, उत्तरपत्रीका तपासणी आणि निकाल जाहीर करणे या करीता शैक्षणिक संस्था (विद्यापीठ/ महाविद्यालये/ शाळा ) सुरु ठेवता येतील. तसेच ज्या बाबी नमूद केल्या नाहीत, परंतु यापूर्वी शासन आदेश व या कार्यालयाचे आदेशान्वये प्रतिबंधीत अथवा शिथील केलेल्या आहेत अशा बाबी त्या बाबीसंदर्भात या पूर्वीच्या लगतच्या आदेशानुसार लागू राहतील.


या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860 , साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. हे आदेश 29 जून ते 31 जूलै 2020 रोजी पर्यंत लागू राहतील असेही आदेशात नमूद केले आहे.


Popular posts
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image
सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Image
कृषी विधेयक स्थगिती अध्यादेशाची उदगीरात भाजपाकडून होळी
Image
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी*
Image
स्त्रियांचा सन्मान करणारेच खरे शिवरायांचे अनुयायी : दिशा पिंकी शेख उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही परंतु स्त्रियांचा सन्मान करणारेच ख-या अर्थाने शिवरायांचे अनुयायी असू शकतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगर परिषदेसमोरील प्रांगणात दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेवून स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते पूर्ण केले. आज समाजात जाती जातीत, धर्माधर्मात भेद करणारी मंडळी वाढत आहे. जाती धर्माच्या पलीकउे जावून देशाच विचार करणाराच खरा देशभक्त असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार चालविताना आपल्या आईचा सन्मान करून समस्त स्त्री जातीचा सन्मान केला असल्याचे सांगितले. आज मात्र आपली आई, बहीण, मुलगी, पुरूषी वर्चस्वाखाली दबून छळली जात आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वरचेवरवाढत चालले आहे. महिलंाना अजूनही वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही अशी खंत व्यक्त करीत जोपर्यंत स्त्रीयांची वैचारिक गुलामगिरी संपणार नाही तोपर्यंत हा शिवरायाचा महाराष्ट्र होणार नाही असे शेख यावेळी म्हणाल्या. सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस कलामहोत्सव पार पडले. या कलामहोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियज निटूरे व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र कठारे, नीता मोरे, काजोल मिरजगावे, संगीता नेत्रगावे, स्वप्नील पकोळे, सुनील कोळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता मोरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय अनिता यलमटे यांनी करून दिला.
Image