माहेश्वरी सभा उदगीर तर्फे 47 रक्त दात्याने केले रक्तदान: पत्रकार सोनी यांचे 61 वे रक्तदान

माहेश्वरी सभा उदगीर तर्फे 47 रक्त दात्याने केले रक्तदान: पत्रकार सोनी यांचे 61 वे रक्तदान


:-कोरोंना च्या पार्श्वभूमी वर सामाजिक अन्तर ठेऊन रक्तदान व आरती संपन्न, माहेश्वरी परिवारानी आपापल्या घरी केली महेश वंदना


उदगीर:- उदगीर तालुका माहेश्वरी सभे तर्फे माहेश्वरी समाज उत्पत्ति दिन महेश नवमी उत्साहात साजरी केली. कोरोंना च्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमात राहुन रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यात 47 रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी माहेश्वरी सभेचे सचिव श्रीनिवास सोनी यांनी 61 वे रक्तदान केले.


माहेश्वरी परिवारानी आपल्या घरीच महेश वंदना केली तर सभे तर्फे लक्ष्मीनारायण मंदिर येथे महेश वंदना करण्यात आली.


उदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे माहेश्वरी समाज उत्पत्ति दिन महेश नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महेश नवमी निमित्ताने लक्ष्मीनारायण मंदिर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यात 47 रक्तदात्यानी रक्तदान सामाजिक अन्तर ठेऊन केले, कोरोंनाच्या पार्श्वभूमी वर प्रशासनाने सार्वजनिक बंदी केल्याने सर्व परिवाराने आपापल्या घरीच महेश वंदना करण्याचे आवाहन सभे तर्फे करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत सर्व परिवारानी आपल्या घरीच महेश वंदना केली. सभे तर्फे लक्ष्मीनारायण मंदिर येथे डॉ रामप्रसाद लखोंटीया यांच्या हस्ते आरती करून महेश वंदना करण्यात आली, ईश्वरप्रसाद बाहेती तर्फे प्रसादी करण्यात आली ती प्रसादी व कोरोंना काळात ह्युमॅनिटी वाढावा म्हणुन प्रत्येक परिवारास त्यांच्या घरी आर्सेनिक एल्बम 30 पोहोचविण्यात आले.


या साठी डॉ रामप्रसाद लखोटीया, डॉ रामेश्वर बाहेती, ईश्वरप्रसाद बाहेती,यांच्या मार्गदर्शना खाली उदगीर तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष विनोदकुमार टवाणी, सचिव श्रीनिवास सोनी, अमोल बाहेती, सत्यनारायण सोमाणी, गोपाल मणियार, अमोल राठी, कोमलकांत मालपाणी, राजू इनानी, द्वारकादास भुतडा, जगदीश बाहेती, शिरीष नावंदर, कैलाश मालू, गोविंद मुंदडा, देवीदास बजाज, विष्णुदास लोया, चंदन अट्टल, कल्पेश बाहेती, सतीश नावंदर यानी विशेष परिश्रम घेतले, अंबरखाने रक्त संकलन केंद्राने रक्त संकलन केले.