उदगीर शहरात आज 5 रुग्ण वाढले
निलंगा येथे एका रुग्णाची वाढ
उदगीर : उदगीर शहरात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, आज मंगळवारी दि. 16 जून रोजी 5 नवीन रुग्ण शहरात वाढले आहेत.
उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातुन 22 जणांचे स्वब लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निलंगा येथून 16 जणांचे स्वब तपासणीसाठी आले होते त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह तर 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दिनांक 15.06.2020 रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा