* आज 54 पैकी 51 व्यक्तींचे स्वाब रिपोर्ट निगेटीव्ह तर 03 पॉझिटीव्ह*

* आज 54 पैकी 51 व्यक्तींचे स्वाब रिपोर्ट निगेटीव्ह तर 03 पॉझिटीव्ह*


*एक पॉझिटिव्ह रुग्ण लातूर शहरातील भाग्यनगर व दोन रुग्ण हिप्परगा ता. औसा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील*


*जिल्ह्यात आजपर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 41, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 04*


लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05 जुन 2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील 20 व्यक्तींचे स्वॅबपैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पाझिटीव्ह आला आहे. ही व्यक्ती जीवन आशा इमारत, नरहर कुरुंदकर मार्ग भाग्य नगर लातूर येथील रहिवासी असून त्यांना ताप, खोकला व दम लागत असून त्यांना शुगरचा आजार आहे. 04 जून रोजी सांगली येथून प्रवास करून आलेले आहेत. दिनांक 04 जून 2020 रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन 02 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 02 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापुर येथील 09 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 09 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. औसा येथील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन *02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या आज पॉझिटिव्ह आलेल्या दोन व्यक्ती हिप्परगा गावातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. 


याप्रकारे लातूर जिल्हयातील एकुण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.