लातुर 56 पैकी 41 निगेटीव्ह 06 पॉझिटीव्ह 07 प्रलंबित ०२ Inconclusive पॉझिटिव्ह मध्ये उदगीरचे तीन रुग्ण

लातुर 56 पैकी 41 निगेटीव्ह 06 पॉझिटीव्ह 07 प्रलंबित ०२ Inconclusive


पॉझिटिव्ह मध्ये उदगीरचे तीन रुग्ण


लातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दि. १० जून रोजी रोजी लातुर जिल्हयातील एकुण ५६ व्यकतींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असुन ०४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी ०२ व्यक्ती लातुर शहरातील असुन एक व्यक्ती उस्मानपुर येथील आहे व दुसरी व्यक्ती हत्ते नगर येथील आहे. एक व्यक्ती उदगीर येथील सराफ लाईन येथील आहे व दुसरी व्यक्ती अंधोरा, औसा येथील आहे. 


 


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन ०५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. औसा येथुन २४व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. कोविड केअर सेंटर, लातुर येथुन ०४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 


असे एकुण ५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ४१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, ०२ व्यक्तींचे अहवाल इंक्लुझिव्ह, ०७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका रुग्णांचा दिनांक 10.06.2020 रोजी (मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान) मृत्यु झालेला असुन हा रुग्ण दिनांक 02.06.2020 रोजी ८ दिवसांपुर्वी सोलापुर येथुन प्रवास करुन आल्यामुळे त्यांना भुक लागत नव्हती, अशक्तपणा येत होता त्यामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुगण औसा येथील कादरी नगर येथील असुन त्यांना पुर्वीपासुनच किडनीचा आजार, उच्च् रक्तदाब व मधुमेह होता, त्यांचे दोन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. सदर रुग्ण दाखल झाल्यापासुन ऑक्सीजन सर्पोर्टवर होता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झालेला आहे. 


तसेच आज दिनांक 10.06.2020 रोजी एका रुग्णाचा मृत्यु झालेला आहे. हा रुग्ण दिनांक 28.06.2020 रोजी या संस्थेच्या रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण मोती नगर, लातुर येथील असुन कुटूंबातील पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना (कोविड 19) ची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच उच्च् रक्तदाबाचा त्रास होता, रुग्णालयात दाखल झाल्यापासुन ते ऑक्सीजन सर्पोर्टवर होते, दिनांक 04.06.2020 रोजी पासुन ते व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. कोरोना मुळे त्यांना निमोनिया झाला होता व अगोदरपासुनच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मृत्यु झालेला आहे अशी माहिती डॉ. राजेश बोबडे सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग व डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख यांनी दिली.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही