उदगीरमध्ये कोरोनाचा पाचवा बळी तर आज नवीन 6 जण कोरोनाबाधित

उदगीरमध्ये कोरोनाचा पाचवा बळी


तर आज नवीन 6 जण कोरोनाबाधित


उदगीर : शहरातील एका 70 वर्षीय कोरोनाबाधित रुगणाचा मृत्यू झाला असून नवीन 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने उदगीरकरामध्ये चिंता पसरली आहे. 


उदगीरमधील नुर पटेल कॉलनीत राहणाऱ्या ७० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा 15 जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. 


या रुग्णात सारीची लक्षणे आढळल्याने व तब्येत खालावल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी लातूरातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल रविवारी (ता.१४) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोवीड रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजारही त्यांना झाले होते. त्यांची एन्जोप्लास्टीही करण्यात आली होती, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.


दरम्यान आज दि. 15 जून रोजी विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातून 19 जणांचे स्वब तपासणीसाठी गेले होते. त्यापैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर तिघा जणांचे अहवाल इंक्लुझिव्ह आले आहेत. 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज दिनांक 15 जून 2020 रोजी पॉझिटिव्ह आलेले 6 रुग्ण उदगीर येथील( हनुमान नगर) पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.