जेतवन बुद्धीविहारच्या विकासासाठी प्रयत्न करणार : ना. संजय बनसोडे

जेतवन बुद्धीविहारच्या विकासासाठी प्रयत्न करणार : ना. संजय बनसोडे


उदगीर : या तालुक्यातील हंगरगा येथे साकारण्यात आलेल्या जेतवन बुद्धीविहारच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून गुलबर्गा येथील बुद्ध विहारच्या धर्तीवर जेतवन बुद्धीविहारचा विकास घडवून आणू अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. 


उदगीर तालुक्यातील हंगरगा येथे मनोहरराव कांबळे यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या जेतवन बुद्धीविहारला राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटूरे, उद्योजक रमेश अंबरखाने, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे,माजी सभापती मधुकर एकूरकेकर, संयोजक मनोहर कांबळे, रिपाई नेते देविदास कांबळे, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव उषा कांबळे, डॉ. गोविंद सोनकांबळे, श्रीरंग कांबळे, एन.एल.तिकटे, एस.डी.कांबळे, जितेंद्र शिंदे, सरपंच चंदर पाटील, विद्यासागर डोरनाळीकर, दयानंद शिंदे ,सत्यवती गायकवाड, किशाबाई कांबळे, चंद्रकला मनोहर कांबळे आदी उपस्थित होते.


यावेळी मंत्रीमहोदयानी जेतवन बुद्धीविहारच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी उषा कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त राज्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज