मातृभूमी आनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सपना चाकोते प्रथम अपूर्वा पाटील द्वितीय !

मातृभूमी आनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सपना चाकोते प्रथम अपूर्वा पाटील द्वितीय !


उदगीर : मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सपना चाकोते प्रथम अपूर्वा पाटील द्वितीय तर अभिषेक भस्मे यांनी तृतीय क्रमांक पटकावला . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते यात महाराष्ट्रभरातून स्पर्धेत सहभागी झाले होते . या स्पर्धेसाठी कोरोना युद्धांचे योगदान, लाॅकडाऊनमध्ये ऑनलाइन शिक्षणाचे महत्व , कोरोनामुळे भविष्यात होणारे बदल हे विषय ठेवण्यात आले होते . या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास रोख रक्कम व प्रमाणपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी सर्व सहभागी स्पर्धकांचे मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे ,मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ उषा कुलकर्णी /उस्तुर ,गणेश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे .या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. किशोर हरणे प्रा .रणजीत मोरे प्रा.अश्विनी देशमुख यांनी काम पाहिले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज